पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभी इश्क के इम्तिहाँ और भी है..नवाब मलिक यांचे सूचक टि्वट

नवाब मलिक आणि संजय राऊत

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यामुळे देशभरातून टीकेचा सूर उमटत आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी त्वरीत टि्वट करत सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे म्हटले होते. राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. काँग्रेसच्या सावरकरविरोधी भूमिकेवर शिवसेनेने टीका केली. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या भविष्यावरही आता चर्चा झडत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक टि्वट केले असून त्यात त्यांनी संजय राऊत यांनाही टॅग केले आहे. भविष्यात अजून अनेक परीक्षा द्याव्या लागणार आहेत, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सावध केले आहे. 

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींच्या पुनरागमनाची शक्यता

नवाब मलिक यांनी उर्दू शायर इक्बाल यांच्या ओळी शेअर केल्या आहेत. सितारों के आगे जहाँ और भी हैं, अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुनही काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका सुरुवातीला वेगळी होती. परंतु, राहुल गांधी यांच्या टि्वटनंतर लोकसभेत विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला होता. त्यामुळे शिवसेनेवर टीकाही झाली होती. सत्तेसाठी सेनेने विधेयकाला विरोध केल्याचे बोलले जात होते. सेनेच्या सुरुवातीच्या भूमिकेवर राहुल गांधी यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले होते. 

'पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीच बालाकोट एअर स्ट्राइक'

मागील ८ दिवसांत काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वैचारिक मतभेद समोर आले आहेत. भाजपने याप्रकरणी शिवसेनेवरही टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हे सूचक टि्वट केले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp leader nawab malik indicative tweet aimed at shiv sena on the issue of rahul gandhis savarkar statement