पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तर लोकसभाच बरखास्त करावी लागेल, नवाब मलिक यांचे भाजपला प्रत्युत्तर

नवाब मलिक

उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाने इतर नावे उच्चारुन मंत्रिपदाची घेतलेली शपथ बेकायदा असल्याचा आरोप भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शपथ घेताना इतरांच्या नावाचा उच्चार करण्याचा पायंडा हा भाजपनेच पाडला असून त्यांच्याच खासदारांनी शपथ घेताना इतरांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे सर्वांत प्रथम लोकसभाच बरखास्त होईल. आतापर्यंत घेतलेले निर्णयही रद्द होतील, असे चोख उत्तर मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

उद्धव ठाकरेंचा शपथविधी बेकायदाः चंद्रकांत पाटील

मलिक पुढे म्हणाले की, जर शपथविधीबाबत आचारसंहिता करायची असल्यास सर्व पक्षांना एकत्र बसावे लागेल. मग निर्णय घ्यावा लागेल. शपथविधीपूर्वी नावं घेण्याची प्रथा भाजपने सुरु केली. त्यांच्याच खासदारांनी ही प्रथा बिघडवण्याचे काम सुरु केले. भाजपने आम्हाला धमकवण्याचे काम करु नये. ते न्यायालयात गेले तर भाजपच्या सर्व सदस्यांना खासदारकी सोडावी लागेल.

बहुमत चाचणीवर संजय राऊत म्हणतात, 170+++++

भाजपने आम्हाला आव्हान देण्याची भाषा करु नये. उलट त्यांनीच आमचे आव्हान स्वीकारावे. त्यांनी ११९ (१०५+१४) आमदार असल्याचा दावा केला आहे. ते आमदार तरी त्यांच्याकडे राहतील का, असा सवाल करत त्यांना पाठिंबा दिलेले काही छोटे पक्ष आमच्या बाजूने आल्याचे त्यांनी सांगितले. 

सदस्य फोडण्याचे राजकारण भाजपने सुरु केल्यास त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

महिला डॉक्टरवर बलात्कार करून जाळले, ४ जण अटकेत