पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'झारखंडच्या जनतेने मोदी-शहांचा अहंकार धुळीस मिळवला'

नवाब मलिक (ANI)

झारखंडच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अहंकार धुळीस मिळवला, असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. राज्यामध्ये भाजपची सत्ता जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरुनच नवाब मलिक यांनी ट्विट करत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

झारखंड निकालानंतर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया

झारखंडमध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे, असे देखील नवाब मलिक यांनी सांगितले आहे. दरम्यान, काहीवेळापूर्वी नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट करत माझा देश बदलत असल्याचे म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा नकाशा पोस्ट करत २०१७ मध्ये सर्वाधिक राज्यांवर भाजपची सत्ता होती हे दाखवले आहे. तर, २०१९ मध्ये हेच चित्र वेगळे असून काही राज्यांवरच भाजपची सत्ता असल्याचे त्यांनी दाखवले आहे.

धक्कादायक: तरुणाने स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडला

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. झारखंडमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र मतमोजणीचे ट्रेंड्स पाहता भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. ८१ जागांपैकी भाजप फक्त २६ जागांवर पुढे आहेत. तर काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी ४६  जागांवर आघाडीवर आहे. 

'महाराष्ट्रानंतर झारखंडही गमावलं, भाजपला आत्मचिंतनाची गरज'