पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर केला'

नवाब मलिक (ANI)

राज्यातील राजकाराणाला आज नवे वळण आले. गेल्या महिनाभरापासून राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटत नव्हता. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होते. अशाच आज मोठी राजकीय घडामोड घडली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांनी राज्यपालांना राष्ट्रवादीच्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र देखील दिले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांच्या पत्राचा गैरवापर केला असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

'..अजित पवार अचानक उठले आणि वकिलाकडे जायचं म्हटले'

आमचा एकही आमदार फुटलेला नाही आणि फुटणार नाही असा विश्वास यावेळी नवाब मलिक यांनी व्यक्त केला. हे सरकार फसवणुकीतून तयार झाले आहे. त्यामुळे जरी शपथविधी झाला तरी हे सरकार पटलावर टीकणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय - शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साडेचार वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. वायबी चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. सर्व आमदार 
आमच्या सोबत आहेत. या बैठकीसाठी सर्व आमदार मुंबईत येत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सर्व आमदार आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहेत असे देखील ते म्हणाले. 

'बकवास' हाच संजय राऊत यांच्यासाठी योग्य शब्दः गिरीश महाजन