पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होय शरद पवार जाणता राजा आहेत; जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाडांची उदयनराजेंवर टीका

'जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजचं आहे' असे म्हणजत शिवाजी महाराजांचे वशंज आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. उदयनराजे यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'होय शरद पवार हे जाणता राजा आहेत' असे सांगत त्यांनी पवारांनी राज्यासाठी केलेल्या कामचा पाढा त्यांनी वाचून दाखवला आहे.

सुशिक्षितांनाही शिकवावे लागते याचे हे योग्य उदाहरण, लेखींचे उत्तर

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, 'होय शरद पवार हे जाणता राजा आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न... अशा प्रश्नांची मालिका सांगा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून... ते जाणता राजा आहेत, असे आव्हाडांनी सांगितले. 

JNU हिंसाचाराशी संबंधित सदस्यांचे मोबाईल जप्त करा: दिल्ली हायकोर्ट

दरम्यान, अनेक जण सांगतात शरद पवारांची करंगळी धरुन आम्ही राजकारणात आलो. अनेक जण त्यांचा करंगळीचा वापर करुन राजकारणात आले आहेत. तसचं अनेक जण त्यांच्यावर टीका करुन हेडलाईनमध्ये आले आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. 

दुसऱ्या महायुद्धातील २५० किलोचे जिवंत बॉम्ब सापडले

दरम्यान, महिलांना ३० टक्के आरक्षण, महिलांना पुन्हा ५० टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नामकरण करणे, कोकण रेल्वे, जेएनपीटी यांसारखे प्रकल्प त्यांनी केले. त्यामुळे महाराष्ट्राच्या ६० वर्षाच्या सर्वांगिक विकासामध्ये सर्वाधिक वाटा कोणाचा असेल तो शरद पवारांचा आहे. म्हणून ते जाणता राजे आहेत, असे आव्हाडांनी सांगितले.  

धक्कादायक: धावत्या एक्स्प्रेसमधून महिलेची बॅग हिसकावली