पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प यांनी गांधीवाद्यांची माफी मागावी: जितेंद्र आव्हाड

आमदार जितेंद्र आव्हाड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. आश्रमातील नोंद वहीवर त्यांनी नोंदवलेल्या अभिप्रायावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या अभिप्रायावरुन नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी माफी, मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोलापूर पोट निवडणूक मित्र पक्षाचा उमेदवारच लढवेल: अजित पवार

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, 'डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. साबरमतीची ओळख जगभरात केवळ एका नावासाठी आहे ती म्हणजे महात्मा गांधी. तिथे जात असताना ट्रम्प यांनी महात्मा गांधी यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे तमाम भारतातीलच नव्हे तर जगभरातील गांधीप्रेमींची मनं दुखावली आहेत, असे आव्हाडांनी सांगितले. तसंच, 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भारताच्या भूमीबद्दल एवढी अनभिज्ञता आणि इतिहासाबद्दल काहीच माहिती नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी याचा निषेध करतो. त्यांनी पूर्ण जगभरातील गांधीवाद्यांची माफी मागावी. हा गांधी विचारांचा अपमान आहे. यांची मी निंदा करतो.', अशी मागणी आव्हाडांनी केली आहे. 

दहशतवादी कारवाया थांबवा; ट्रम्प यांचा पाकिस्तानला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी सुरुवातीला गुजरातच्या अहमदाबाद येथे भेट दिली. त्याठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अहमदाबाद दौऱ्या दरम्यान ट्रम्प कुटुंबियांनी साबरमती आश्रमाला भेट देली. या भेटीवेळी त्यांनी आश्रमातील नोंद वहीवर अभिप्राय लिहिला. ‘माझे जिवलग मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ही अविस्मरणीय भेट घडवल्याबद्दल आभार,’ असा अभिप्राय ट्रम्प यांनी नोंद वहीत लिहिला. 

'चायवाला'...खूप कडक आहे, ट्रम्प यांची 'मन की बात'