पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राजकारणात रेडिमेड कपडे घालत नाहीत, जयंत पाटलांचा भाजपला टोला

जयंत पाटील

फोडाफोडीचं राजकारण करुन भाजपमध्ये काँग्रेसीकरण सुरु आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना घेऊन पक्ष वाढवणे म्हणजे रेडिमेड कपड्याला प्राधान्य देण्यासारखे आहे. राजकारणात रेडिमेड नव्हे तर शिवून कपडे घालतात, असा टोलाही त्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपला लगावला. 

'आमच्या काळात महाराष्ट्र सर्व आघाड्यांवर नंबर वन'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आम्ही मोठी केलेल्या लोकांना घेऊन पक्ष मोठा करण्यापेक्षा आपल्या पक्षातील लोकांना मोठं करा, असा सल्ला जयंत पाटील यांनी राज्यातील भाजप सरकारला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. यात चित्रा वाघ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होते.

पक्षाला रामराम केलेल्या नेत्यांमुळे पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही, असेही ते म्हणाले. चित्रा वाघ यांच नाव न घेता ते म्हणाले की, महिला आघाडीचं कोणी गेल असले तरी त्याचा किंचितही परिणाम पक्षावर झालेला नाही. पक्षाशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते कधीही दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत. 

सगळं आधीच ठरलं असेल तर निवडणूक लढवायचीच कशाला - राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आघाडी बाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पूरजन्य परिस्थितीमुळे आघाडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यातील २८८ जागांबाबतची चाचपणी करुन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.