पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राधाकृष्ण विखे-पाटील आमचेच आहेत, आम्ही त्यांना ओढून आणू'

जयंत पाटील

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले. देवेंद्र फडणवीस हे आपले नेते आहेत. गेली ५ वर्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी सांगितले की, राधाकृष्ण विखे पाटील आमचेच आहेत. आम्ही त्यांना ओढून आणू.

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

दरम्यान, जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला देखील लगावला आहे. 'आपण पुढील पाच वर्षे सत्तेत येण्याचा प्रयत्न करु नये. कोणत्याही बाजूच्या सदस्यांना जागा सोडायला लावू नये, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसंच, मी परत येईन ही जी तुमची भूमिका होती त्यात तुम्ही कुठे बसेन हे सांगितले नव्हते, असा देखील टोला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला आहे. 

शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. रविवारी विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. फडणवीस यांची निवड होणार हे निश्चित होती. त्याची औपचारिकता आज पार पाडली. विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. 

पाच वर्षांत ११४ कंपन्या बंद, १६ हजार कर्मचाऱ्यांना फटका