पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांचा पाठिंबा: जयंत पाटील

जयंत पाटील

राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मित्रपक्षांसोबत बैठक झाली. दरम्यान, 'सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर मित्रपक्षांसोबत चर्चा झाली. मित्र पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा दिला.', असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. 

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर

बैठकीमध्ये भाजप सोडून राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी सर्वांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करावे, अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केली. तसंच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्र येण्यासाठी सर्वांनी एकमत व्यक्त केले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. 

५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री; तिन्ही पक्षांची सहमती: संजय राऊत

दरम्यान, सत्तास्थापनेसाठी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस आज राज्यपालांची भेट घेऊन दावा करणार असल्याचा चर्चा सुरु आहे. यावर शिवसेनेशी चर्चा झाल्यानंतरच सत्ता स्थापनेचा दावा करु, असे जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

IndvsBan day-night test live: बांगलादेशला चौथा धक्का

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp leader jayant patil says all alliance partners support of allies for government formation