पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महापुरुषांबद्दल भाजपला इतकी असूया का आहे; जयंत पाटलांचा सवाल

जयंत पाटील

बहुमत चाचणी सिध्द करण्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार यशस्वी झाले आहे. दरम्यान, 'शपथविधीवेळी जर आम्ही छत्रपती शवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख केला तर देवेंद्र फडणवीस आणि भाजपला का राग यावा?', असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

छत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव ठाकरे

महा विकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधी वेळी महापुरुषांच्या नावांचा उल्लेख केला यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. याला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपला ऐवढा राग का आहे ? आजच नाही, पिढ्यानपिढ्या यांच्या मनामध्ये ही असूया का आहे? असा सवाल उपस्थित करत या सगळ्यांच्या मनातून आज राग बाहेर आला असल्याचे, जयंत पाटील यांनी सांगितले. 

'आम्ही १६९'!, महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला

दरम्यान, शपथविधीनेळी जे टेक्स्ट आमच्या हातात होते त्याचेच आम्ही वाचन केले, असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेता दर्जेदार असावा. देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्ष नेतेपदासाठी बहुधा स्पर्धा असावी, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. 

अधिवेशन नियमांना धरुन होत नाही: फडणवीस