पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंंडेंची मागणी

धनंजय मुंडे

नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलक आणि आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करणारे  पर्यावरणप्रेमी यांच्याविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानंतर आता भीमा-कोरगाव प्रकरणात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत आज निर्णय?

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आणि आंदोलनकर्त्यांवीरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या पंतप्रधान मोठ्या मनाचे, पण...

याआघी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मागची सरकार भीमा-कोरेगाव हिसांचार प्रकरणातील गुन्हे मागे देण्याचे आदेश दिले होते. आधी आम्ही त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे तपासून पाहू.

राज्यातील एकाही प्रकल्पाला स्थगिती नाही: CM उद्धव ठाकरे

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp leader dhananjay munde written to uddhav seeking withdrawal of cases in bhima koregaon