पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम; भाजपच्या वाटेवर?

चित्रा वाघ

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सूपूर्द केला आहे. चित्रा वाघ या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. येत्या ३० जुलैला त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे.

येडियुरप्पांकडून जुने आदेश स्थगित, २९ जुलैला विश्वासदर्शक 

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड हे देखील भाजपच्या वाटेवर आहेत. चित्रा वाघ, मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती खासगी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला एकामागे एक धक्के बसत आहे.

कर्नाटकः येडियुरप्पांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हातामध्ये शिवबंध बांधले. गुरुवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शरद पवार हे माझ्या हृदयात आहेत. पण वरळी विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती बघून आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला, असे त्यांनी सांगितले. 

Mumbai Rains Live Update: मुंबईमध्ये मुसळधार; बदलापूर- कर्जत लोकलसेवा ठप्प