पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही: छगन भुजबळ

छगन भुजबळ (Photo by Pramod Thakur/ Hindustan Times)

२६ जानेवारीपासून सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब आणि गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

'...हा भाजप आणि संघ परिवाराला बदनामीचा कट'

छगन भुजबळ यांनी पुढे असे सांगितले की, या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी आणि महानगरपालिका क्षेत्रात किमान १ भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. हे भोजनालय दुपारी १२ ते २ या कालावधीत सुरु राहतील. या भोजनालयात योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.

मुंबईतील 'नाईट लाईफ'ला मंत्रिमंडळाची मंजुरी, अशी होणार

दरम्यान, भोजनालय चालविण्यासाठी या मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी. भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. तसंच, एका भोजनालयात किमान ७५ आणि कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होणार आहे. या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे, असे देखील त्यांनी सांगितले. 

...म्हणून अनिल कुंबळेंनी मानले PM मोदींचे आभार