पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

छगन भुजबळ (Photo by Pramod Thakur/ Hindustan Times)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे गुरुवारी सकाळी त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ नाशिकच्या येवला मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. निवडणुकीवेळी त्यांची खूप धावपळ झाली. तसंच बुधवारी ते  राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला सुध्दा उपस्थित होते. मात्र गुरुवारी सकाळी उच्च रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कॉग्निझंटमधून लवकरच १३००० कर्मचाऱ्यांची कपात

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळी मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांना सुध्दा बुधवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. 

कल्याणजवळ तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत