पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल: छगन भुजबळ

छगन भुजबळ (ANI)

राज्यामध्ये ठाकरे सरकार पहिली परिक्षा पास झाले आहे. आज ठाकरे सरकारची दुसरी परिक्षा होणार आहे. आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान, 'विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हंगामी अध्यक्षांकडून फडणवीस यांना चहापाण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी पटोले विरुध्द कथोरे लढत

राज्यामध्ये महाविकास आघाडीला बहुमत सिध्द करण्यात यश आले. आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी सकाळी १० पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार नाना पटोल तर भाजपकडून आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

१ डिसेंबरपासून हे ५ नियम बदलले; ज्याचा थेट परिणाम खिशावर

अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पटोले विरुध्द कथोरे यांच्यात लढत होणार आहे. अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी गुप्त मतदान घ्यावे अशी मागणी भाजपने केली आहे. दरम्यान, या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येते की नाही? तसंच या निवडणुकीत नेते नाना पटोले बाजी मारतात की भाजपचे आमदार किसन कथोरे बाजी मारतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सियाचीनमध्ये पुन्हा हिमस्खलन; दोन जवान शहीद