पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: जेव्हा तुझा बाप.., सीएएवरुन जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

जितेंद्र आव्हाड

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) देशात वेगवेगळ्या भागात आंदोलन होत आहेत. सीएए आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) वरुन नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्यही पाहण्यास मिळत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो. भारताचा नागरिक असल्याचा पुरावा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भिवंडी येथे आयोजित आंदोलनादरम्यान त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेनेः प्रकाश आंबेडकर

ते म्हणाले, मी दिल्लीच्या तख्तला विचारु इच्छितो, मी देशवासी असल्याचा पुरावा तू मागणार का? आता तू ऐक, जेव्हा तुझा बाप इंग्रजांसमोर झुकून त्यांचे तळवे चाटत होता. तेव्हा माझा बाप फाशीच्या तख्ताचे चुंबन घेत इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होता. 

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जे पी नड्डा यांची बिनविरोध निवड

दरम्यान, सीएएविरोधात दिल्लीतील शाहिनबागपासून ते वेगवेगळ्या भागात आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्षांकडून हा कायदा मागे घेण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर जिथे-जिथे काँग्रेसचे सरकार आहे. त्या राज्यांनी हा कायदा लागू करण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर केरळ सरकारने या कायद्याच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.