पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीकडून नाराज आमदार प्रकाश सोळंकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु

आमदार प्रकाश सोळंके

महाराष्ट्रात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले आहे. मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर शिवसेनेच्या काही नेत्यांमध्ये नाराजी पहायला मिळाली तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये सुध्दा काही आमदार नाराज झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, राहुल चव्हाण यांच्यानंतर आमदार प्रकाश सोळंके हे नाराज झाले आहेत. प्रकाश सोळंके यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. 

CAA विरोधात रस्त्यावर उरतलेल्या ममता बॅनर्जींना शरद पवारांचा पाठिंबा

राजीनामा देण्यासाठी प्रकाश सोळंके पुण्याहून मुंबईत दाखल झाले आहेत. राजीनामा देण्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे वेळ मागितला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये दिग्गज नेत्यांकडून त्यांची समजून काढली जात आहे. 

'देश तोडण्याचं इंग्रजांचं अर्धवट काम भाजप पूर्ण करतंय'

बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघातून प्रकाश सोळंके हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना ते मंत्री होते. दरम्यान, राष्ट्रवादीकडून मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी हे सुध्दा स्पष्ट केले आहे की, मंत्रिपद न दिल्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.

'देश तोडण्याचं इंग्रजांचं अर्धवट काम भाजप पूर्ण करतंय'

राजीनामा देणार असल्याची बाब प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातली होती. तसंच, एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षात पहिल्यांदा निवडून आलेल्यांना मंत्री केले जाते. मात्र चार वेळा निवडून आलो असताना मला मंत्री केले जात नाही. पक्षामध्ये माझ्यासारख्या लोकांना काहीच जागा नाही, असे त्यांनी सांगितले होते. 

शपथविधीनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली राहुल गांधींची भेट