पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बँका डबघाईला आल्यात'

अजित पवार

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अशामध्ये या बँकेच्या ग्राहकांची धावाधाव झाली आहे. बँक आर्थिक डबघाईला आल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या बँकांच्या डबघाईला हे सरकार जबाबदार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. 

युती होणार नाही असं वाटणाऱ्यांची निराशा होईलः चंद्रकांत पाटील

अजित पवार यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, 'देशाच्या बिकट अर्थव्यवस्थेमुळे बँकांना व्यवहार हाताळणं अवघड बनलंय. पीएमसी बँक आर्थिक गर्तेत सापडलीय. रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातलेत. पुढचे ६ महिने ठेवीदारांना नाहक त्रास होणार आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बँका डबघाईला आल्यात.' असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. 

खारमध्ये इमारतीचा भाग कोसळला, अग्निशामक दल घटनास्थळी

दरम्यान, ३५ अ कायद्या अंतर्गत आरबीआयने बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. २३ सप्टेंबर म्हणजे आजपासून पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेला आरबीआयच्या मान्यतेशिवाय कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे बँकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तसंच ऑनलाईन बँक व्यवहार देखील ठप्प झाले आहेत. तसंच, पीएमसी बँकेच्या खातेदारांना फक्त १ हजार रुपये ऐवढीच रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे या बँकेचे ग्राहक चिंतेत आले आहेत. त्यांनी या बँकेमध्ये मोठी गर्दी केली आहे. 

धोनीही एका दिवसात तयार झाला नाही, युवीकडून पंतची पाठराखण