पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आमचं ठरलंय, आम्ही विरोधी पक्षातच बसणार: अजित पवार

अजित पवार

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झाले तरी राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटेना. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेवरुन वाद सुरु आहे. अशामध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करेल अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आम्ही विरोधीपक्षामध्येच बसणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळाचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारविरोधात काँग्रेस करणार आंदोलन; विरोधी पक्षांची बोलावली बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. 'आम्ही फक्त सरकार कधी स्थापन होतंय हे बघत आहोत. बाकीच्या भाजप आणि सेनेच्या वक्तव्यांमध्ये आम्हाला काहीच तथ्य वाटत नाही. शरद पवारांनी आणि इतर मान्यवरांनी वारंवार सांगितले आहे की आम्ही विरोधी पक्षात बसणार आहे. जनतेनं सुध्दा आम्हाला जो कौल दिला आहे. तो आम्हाला मान्य असून आम्ही विरोधी पक्षातच बसणार आहेत, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

शरद पवार मुंबईत, राजकीय हालचालींना वेग

दरम्यान, राज्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्याला या संकटामधून बाहेर काढण्याचे त्यांना आधार देण्याचे काम  सरकारच करू शकते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसंच, पावसामुळे कोट्यवधी एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याला आधार देण्यासाठी सरकारने १० हजार कोटींची केलेली मदत ही तुटपुंजी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  

दिल्लीत पोलिस आणि वकिलांमध्ये हाणामारी, काही जण जखमी