पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यपालांनी भेटण्यासाठी बोलावले - अजित पवार

अजित पवार

राज्यामध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यात अपयश आले. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फोन केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना राज्यपालांनी फोन करुन चर्चेसाठी बोलावले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी निमंत्रण दिले असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपालांना भेटण्यासाठी जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. 'राज्यपालांनी साडेआठ वाजता मला फोन केला. त्यांनी आम्हाला भेटण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे- पाटील आम्ही राज्यपालांकडे निघालो आहोत. राज्यपालांनी नेमकं कशासाठी बोलावले आहे हे माहिती नाही.', असे अजित पवार यांनी सांगितले.