पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्रात-राज्यात सत्ता असताना सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?; अजितदादांचा भाजपला सवाल

अजित पवार

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात यावा अशी मागणी करत गोंधळ घालणाऱ्या भाजपवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना 'भारतरत्न' का दिला नाही, असा सवाल अजित पवारांनी भाजपला केला आहे. 

दिल्ली हिंसाः दगडफेकीत ठार झालेल्या गुप्तचर अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला

'सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान कोणीही नाकारत नाही. मात्र, त्यांच्याबद्दलची प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. सावरकरांबद्दल व्यक्ती तितकी मतं असतात. इतरांचं मत आमच्यासारखंच असावं, हा आग्रह चुकीचा आहे', असे अजित पवारांनी सांगितले. तसंच, सावरकरांच्या देशकार्याबद्दल आम्हाला आदरच आहे. मात्र, सावरकरांच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांना नेमका काय स्वार्थ साधायचा आहे हेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. 

शांतता आणि बंधुभाव राखा, नरेंद्र मोदींचे दिल्लीकरांना आवाहन

तर, सावरकरांची गायी आणि बैलाबद्दलची मतं खूपच वेगळी आहेत. ते प्रखर विज्ञानवादी होते. ती सगळ्यांनाच पटतात असं नाही, असे देखील अजित पवारांनी सांगितले. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरुन सत्ताधारी आणि भाजपमध्ये खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमांवर बोट ठेवून सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होत सभागृहात गोंधळ घातला. 

एवढी लाचार शिवसेना कधीच पाहिली नाही, फडणवीसांचा प्रहार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp leader ajit pawar ask why not given bharat ratna to savarkar while in power in the center and state