पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात शरद पवार यांनी केले महत्त्वाचे विधान...

शरद पवार बैठकीसाठी जाताना

शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी व्हायचे का, याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे घेतील. आम्ही काँग्रेसशी आघाडी करून निवडणूक लढलो होतो. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होते आहे. या बैठकीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी ही माहिती दिली.

राज्यपालांकडून दुजाभाव, भाजपला ७२ तर आम्हाला फक्त २४ तासः संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही इतक्या घाईगडबडीत कोणताही निर्णय घेतला जात नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणूक लढविली होती. राज्यात जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. पण आता भाजपने शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करू शकत नसल्याचे म्हटले आहे. बदलत्या राजकीय स्थितीत कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षासोबत जावे, हा प्रश्न सोपा नाही. आमची आजपर्यंत कोणत्याही इतर पक्षाशी चर्चा झालेली नाही. आमच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक आकडे नाहीत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर गंभीर चर्चा होणे अपेक्षित आहे. ती चर्चा आज आम्ही करणार आहोत, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

बाबरी मशिद बेकायदा होती तर ती पाडल्याबद्दल अडवाणीवर गुन्हा का?

भाजपच्या नेत्यांनी रविवारी संध्याकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आम्ही सरकार बनवू शकत नसल्याचे सांगितले. महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढविली होती. पण आता शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी मदत करीत नसल्यामुळे आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करू शकत नसल्याचे भाजपने स्पष्ट केले.