पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवारांकडून पाकिस्तानी जनतेचं कौतुक

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाकिस्तानच्या जनतेचे कौतुक केले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तानात गेल्यानंतर माझे चांगले स्वागत झाले. भारतात येऊन पाकिस्तानमधील नागरिकांना भलेही त्यांच्या नातेवाईकांना भेटता येत नसेल, मात्र तिकडे गेलेल्या व्यक्तीला पाकिस्तानमधील नागरिक आपल्या नातेवाईकांप्रमाणेच पाहुणचार करतात.  

पाकिस्तानमधील वास्तविक स्थिती न पाहता आपल्याकडे पाकिस्तानी नागरिकांविषयी गैरसमज निर्माण केले जात आहेत. राजकीय लाभ उचलण्यासाठीच तेथील जनतेबाबत द्वेषाची भावना निर्माण केली जात आहे. सत्ताधारी वर्ग राजकीय फायद्यासाठी खोटी माहिती पसरवत आहे. अशा भाषेत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक तोफ डागलीय.