पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीमा-कोरेगावचा तपास एनआयएकडे देण्याचा राज्य सरकारचा निर्णय चुकीचाः शरद पवार

उद्धव ठाकरे आणि शरद पवार

भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराचा तपास पुणे पोलिसांकडून काढून राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) देण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या निर्णयावर नाराज असल्याचे समोर आले आहे. हा तपास एनआयएकडे सोपवण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चुकीचा असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे. अशा पद्धतीने राज्य सरकारच्या हातातून केंद्राने तपास काढून घेणे चुकीचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनेही या निर्णयाला पाठिंबा देणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. 'एएनआय'ने यासंबंधी वृत्त दिले आहे. 

भीमा कोरेगावचा तपास NIA कडे देण्याला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांमधील काही व्यक्तींची (भीमा-कोरेगाव तपासात सामील असलेले) वर्तणूक ही आक्षेपार्ह होती. या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. 

सकाळी महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्री आणि पोलिस अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आणि दुपारी ३ वाजता केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्याचा आदेश काढला. राज्य घटनेनुसार हे चुकीचे आहे. कारण गुन्ह्याचा तपास करणे हे राज्य सरकारच्या अखत्यारित येणारी बाब आहे, असेही पवार यांनी म्हटले. 

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा पद्धतीने हा तपास एनआयएकडे देण्याला आमचा विरोध आहे. पण मुख्यमंत्री वेगळा निर्णय घेऊ शकतात. त्यांना अधिकार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:NCP chief Sharad Pawar on the transfer of Bhima Koregaon case probe to the NIA says its wrong decision of state government