पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवार यांनी लीलावतीमध्ये घेतली संजय राऊतांची भेट

शरद पवार लीलावतीतून बाहेर पडताना

छातीत दुखत असल्यामुळे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना सोमवारी दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सोमवारीच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सकाळी लीलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली. सुमारे १५ ते २० मिनिटे शरद पवार हे संजय राऊतांसोबत होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस यावेळी त्यांनी केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी राजकीय चर्चा झाली की नाही, याची माहिती मिळालेली नाही. 

सोमवारच्या घडामोडींनंतर संजय राऊत यांचे लीलावतीतून सूचक ट्विट

राज्यात सध्या वेगवान राजकीय घडामोडी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेनेला काल संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आपल्या सत्तास्थापनेचा निमंत्रणावर उत्तर द्यायचे होते. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याची पत्रे न दिल्यामुळे शिवसेनेची सत्ता स्थापनेची संधी तात्पुरती हुकली आहे. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. 

आमच्यात एकवाक्यता झाल्याशिवाय शिवसेनेला पाठिंबा नाहीः अजित पवार

आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी कधी पाठिंबा देणार, त्यासाठी किमान समान कार्यक्रम काय असणार, मुख्यमंत्री कोण होणार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत काय मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.