पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची वर्णी

नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष पदी नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेनंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मुंबई अध्यक्ष पद रिक्त झाले होते. अखेर या पदी नवाब मलिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्या दुपारी 3 वाजता नवाब मलिक मुंबई अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

 

हा क्रांतीकारक नव्हे तर राजकीय निर्णयः सोली सोराबजी

दरम्यान, नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. कुर्ला- अणुशक्तीनगर विभानसभा मतदारसंघातून ते चार वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. तसंच ते राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री देखील राहिले होते. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई शाखेच्या कार्याध्यक्ष पदाची देखील जबाबदारी पार पाडली आहे. प्रवक्ते पदाच्या माध्यमातून ते आपल्या पक्षाची बाजू रोखठोक पध्दतीने मांडत आले आहेत.  

कलम 370: केंद्राकडून लष्कर आणि वायूदलाला हाय अलर्ट जारी