पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'जय मोदीचा नारा दिला तर पाकिस्तानींना सुद्धा पद्मश्री मिळेल'

नवाब मलिक

पाकिस्तानी वंशाचा गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मनसे, काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुध्दा अदनान सामीला पुरस्कार देण्यास विरोध केला आहे. पाकिस्तानमधून येऊन कोणी जय मोदीचा नारा देत असेल तर त्याला भारताचे नागरिकत्व दिले जाते त्याचसोबत त्याला पद्मश्री पुरस्कार सुध्दा दिला जातो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

तर मराठवाडा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, फडणवीसांचा इशारा

नवाब मलिक यांनी सांगितले की, 'अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यावरुन मोदी सरकारची निती स्पष्ट दिसून येत आहे. मोदींना तसंच भाजपला वाटले तर पाकिस्तानींना भारतीय नागरिकत्व मिळेल आणि पद्मश्री पुस्काराने सुध्दा गौरवण्यात येईल. हा देशातील जनतेचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. मात्र, जे भारतीय आहेत त्यांना भारतीय असल्याचा पुरावा मागितला जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले. 

'दहा रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब

दरम्यान, केंद्र सरकारकडून शनिवारी पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली. तर गायक अदनान सामी याला सुध्दा पद्मश्री पुरस्काराची जाहीर करण्यात आला. दरम्यान, अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याला मनसे, काँग्रेसने विरोध केला आहे. मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत मोदी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तर काँग्रेसने मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारत टीका केली. 

बिहारमध्ये कोरोना विषाणू: चीनवरुन आलेल्या विद्यार्थिनीत आढळली लक्षणे