पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फडणवीसांनी खडसेंकडे 'क्लास' लावावा: नवाब मलिक

नवाब मलिक

महाविकास आघाडीचे सरकार बहुमत चाचणी सिध्द करण्यात यशस्वी झाले. मात्र सर्व नियम आणि कामकाज धाब्यावर बसवून अधिवेशन होत असल्याचा आरोप करत भाजपने सभात्याग केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. भाजपने बहाणेबाजी करत सभात्याग केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसंच, विरोधी पक्षनेत्याचे काम कसे चालते हे फडणवीसांनी शिकावे. त्यासाठी त्यांनी एकनाथ खडसे यांच्याकडे क्साल लावावा, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

छत्रपतींच्या, आई-वडिलांच्या नावानं शपथ घेणं गुन्हा नाहीः उद्धव ठाकरे

तसंच, खोट्याने देश कधीच चालत नाही. हंगामी अध्यक्ष राज्यपालांच्या मान्यतेनंतर बदलण्यात आला होता. राज्यपालांच्या मान्यतेनेच विधानसभा बोलावली गेली होती. राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतरही भाजप प्रश्न उपस्थित करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसंच, बहुमत चाचणीवेळी भाजपने सभात्याग केला. यावर नवाब मलिक यांनी टीका केली आहे. पळण्यासाठी मार्ग पाहिजे होता म्हणून भाजपने ही भूमिका घेतली, असल्याचे त्यांनी सांगितले. 

महापुरुषांबद्दल भाजपला इतकी असूया का आहे; जयंत पाटलांचा सवाल

बहुमत चाचणी सिध्द करण्यासाठी घेतलेले मतदान सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर घेण्यात आले होते तरी सुध्दा भाजप प्रश्न उपस्थित करत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.  भाजपने ११९ चा दावा केला होता तो खोटा होता. त्यांच्याकडे फक्त १०५ चा आकडा होता. त्यामुळे भाजप खोटं बोलत असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे, नवाब मलिक यांनी सांगितले. 

'आम्ही १६९'!, महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव जिंकला