राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांच्या गौप्यास्फोटानंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे चित्र पहायाला मिळत आहे. अशोक चव्हाण यांची बोलण्याची पध्दत चुकीची असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झाले आहे. त्यामुळे कोणीही कुणाकडून काहीही लिहून घेतलेले नाही, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.
'केंद्राने लवकर परवानग्या दिल्या तर महाराष्ट्राचा विकास होईल'
अशोक चव्हाणांच्या भाषणाच्या बाबतील वेगळ्या पध्दतीने प्रचार होत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये तिन्ही पक्षांच्या बैठका झाल्या. तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. किमान समान कार्यक्रम तयार करताना आमचे सरकार घटनेशी बांधिलकी राहिल, असे ठरले होते. किमान समान कार्यक्रमासाठी तिन्ही पक्षंनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
... तर घटनात्मक पेच निर्माण होईल - सुधीर मुनगंटीवार
दरम्यान, नांदेडमध्ये २६ जानेवारीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता. 'घटनाबाह्य काहीही काम करणार नाही. घटना सर्वोच्च मानून त्याच्या चौकटीतच सरकार चालवू हे शिवसेनेकडून लिहून घ्या, अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याआधी केली होती. त्यानुसार शिवसेनेने लिहून दिल्यावरच आम्ही सत्तेत सहभागी झालो, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी पहायला मिळत आहे.
CAA नुसार नागरिकत्व मागणाऱ्यांना धर्माचा पुरावा द्यावा लागणार