पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवनीत राणांनी पहिलं वेतन दिलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

रवि राणा, मुख्यमंत्री आणि नवनीत राणा

खासदार नवनीत कौर राणा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी खासदारकीचं पहिलं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलं. नवनीत कौर राणा यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन वेतनाचा धनादेश त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यामध्ये सध्या भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. अशामध्ये शेतकऱ्यांना मदत म्हणून पहिले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे त्यांनी सांगितले. नवनीत राणा यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा हे देखील उपस्थित होते.

... तर नरेंद्र मोदी यांनी देशहिताला धोका दिला - राहुल गांधी

नवनीत राणा यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ' देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा बंगल्यावर आपला खासदारकिचा पहिला पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला. यावेळी सोबत आमदार रवि राणा हे ही उपस्थित होते.'

पंतप्रधानांनी ट्रम्प यांना विनंती केली नाही, जयशंकर यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, राज्यामध्ये असलेल्या भीषण दुष्काळ परिस्थितीचा सामना शेतकरी करत आहे. पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अमरावतीमधील शेतकऱ्यांना देखील दुष्काळ परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी त्यांच्या जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीची माहिती देत लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करवी अशी मागणी यावेळी केली. 

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचे आरोपपत्र तयार