पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबईतील नगरसेवकही घड्याळ काढून भाजपचा झेंडा हाती घेणार

नवी मुंबईतील नगरसेवक भाजपात प्रवेश करणार

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. नगरसेवकांनी सोमवारी एका बैठकीत हा निर्णय घेतला असून ते आपला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेते गणेश नाईक यांना कळवणार आहेत.  

राष्ट्रवादीसह एकूण ५७ नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त मराठी वृत्तवाहिनी 'एबीपी माझा'ने दिले आहे. नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे नवी मुंबई महानगर पालिकेत सत्ता पालट होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या घडीला राष्ट्रवादीच्या हाती असणारी सत्ता भाजपच्या ताब्यात जाईल. समर्थकांच्या दबावानंतर गणेश नाईकही भाजपात प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर चित्रा वाघ यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली होती. त्यानंतर  नवी मुंबईतही आता राष्ट्रवादीला दणका बसणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

राष्ट्रवादीतील गळतीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग सुरु असून नेत्यांना चौकशीची भीती दाखवून राज्य सरकार फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. पक्ष पुन्हा उभा राहिलं असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.