पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबईत दहशतवाद्याचे कौतुक करणारा संदेश लिहिल्याप्रकरणी एक जण ताब्यात

घटनास्थळाचे छायाचित्र

इस्मामिक स्टेटचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचे कौतुक करणारा संदेश नवी मुंबईतील उरण येथील खोपटा पुलाच्या खांबावर लिहिल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. ती व्यक्ती मनोरुग्ण असून, तिच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एएनआयने या संदर्भात ट्विट केले आहे.

खोपटा पुलाच्या खांबावर नागरिकांना हा संदेश दिसल्यावर त्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली होती. 'जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी' असा या संदेशात अबू बक्र अल बगदादी याचा उल्लेख करण्यात आला होता.

नवी मुंबईत पुलाच्या खांबावर दहशतवादी बगदादीचे कौतुक करणारा संदेश, तपास सुरू

हिंदीतून हा संदेश लिहिण्यात आला होता. त्यामध्ये केजरीवाल, हाफिज सईद, राम कटोरी आणि रहिम कटोरी यांची नावे लिहिण्यात आली होती. संदेशाशेजारी बंदराची, विमानतळाची आणि इतर काही संस्थांची रेखाचित्रे रेखाटण्यात आली होती. कुर्ला आणि घाटकोपरच्या भागाचीही रेखाचित्रे काढण्यात आली होती. मंगळवारी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. संदेश ज्या खांबावर लिहिण्यात आला होता. तिथे पोलिसांनी काळा रंग लावला आहे. कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. अखेर त्यांनी एकाला ताब्यात घेतले आहे.