पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विनयभंग प्रकरण: DIG निशिकांत मोरे यांना कोर्टाचा दिलासा

पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. कोर्टाने निशिकांत मोरेंना पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, कोर्टाने निशिकांत मोरे यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. अटक झाल्यास २५ हजारांच्या जामिनावर निशिकांत मोरे यांची सुटका करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान याप्रकरणात निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

केंद्राची बाजू ऐकल्याशिवाय CAA ला स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट

पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर नवी मुंबईतील अल्पवयीन मुलीने विनयभंग केल्याचा आरोप केला होता. ५ जून २०१९ ला पीडित मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वडिलांनी निशिकांत मोरे यांना घरी बोलावले होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर निशिकांत मोरे यांनी पीडित मुलीच्या चेहऱ्यावर लावलेला केक खाल्ला. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यानंतर पीडित मुलीने निशिकांत मोरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. २६ डिसेंबरला निशिकांत मोरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

ई-तिकीटांचा काळाबाजार आणि दहशतवाद्यांना मदत करणारी टोळी

दरम्यान, या प्रकरणामध्ये पीडित मुलगी ६ जानेवारी रोजी सुसाईड नोट लिहून घरातून बेपत्ता झाली होती. रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या करते. माझ्या आत्महत्येला शशिकांत मोरे जबाबदार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. मात्र पीडित मुलगी देहराडून येथे मित्रासोबत सापडली होती. १९ वर्षीय तरुणाविरोधात पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाला १५ जानेवारी रोजी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला  १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

''बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा''