पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पनवेलमध्ये कारच्या धडकेत भाजप नगरसेविकेचा मृत्यू

भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे

नवी मुंबईमध्ये कारच्या धडकेमध्ये भाजपच्या नगरसेविकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पनवेलच्या भाजप नगरसेविक मुग्धा लोंढे यांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास भरधाव कारने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये मुग्धा लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या माजी नगरेसविका कल्पना राऊत या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

काँग्रेसने नाना पटोलेंना साकोलीमधून दिली उमेदवारी

मुग्धा लोंढे आणि कल्पना राऊत या दोघी एका कामासाठी चालल्या होत्या. पनवेल येथील प्राचीन रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्या शेजारी त्या उभ्या होत्या. त्याच दरम्यान भरधाव वेगात आलेल्या कारने दोघींना जोरात धडक दिली. या अपघातात मुग्धा लोंढे यांचा मृत्यू झाला. तर कल्पना राऊत गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राचीन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कारचालक महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली आहे. 

दीपाली सय्यद शिवसेनेत; कळव्यातून लढवणार निवडणूक

या अपघातानंतर पोलिसांनी कारचालक महिलेला ताब्यात घेतले. पनवेल पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. मुग्धा लोंढे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस