पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवी मुंबई: CISFच्या आणखी ६ जवानांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणू

खारघर येथे नियुक्त असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणखी ६ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याआधी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५ जवानांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबई विमानतळावर हे जवान तैनात होते. तर खारघर येथील एका इमारतीमध्ये ते सर्वजण राहत होते.

'सरकारने सर्व अटी मागे घेत ३ महिन्यांचे धान्य एकत्र द्यावे' 

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या १३९ अधिकारी आणि १२ कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांची तपासणी करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांचा तपासणी अहवाल आला. यामध्ये आणखी ६ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आतापर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ११ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे.

दिलासादायक! मुंबईतील कोरोनाबाधित बाळासह आईचा रिपोर्ट निगेटिव्ह  

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सर्व जवानांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयातील स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, ज्यावेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्याचवेळी शिवाजी दौंड यांनी याप्रकरणात लक्ष घालून इतर सर्व जवानांना तात्काळ विलगीकरण कक्षात हालवल्यामुळे कोरोना वाढण्याचा धोका टळला. 

मोदींच्या आवाहनावर आव्हाड-मलिकांची टीका तर रोहित पवारांकडून स्वागत