पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहावीच्या चाचणी परीक्षेदरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

नवी मुंबईत दहवीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. वाशीतील मॉर्डन स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. सायली अभिमान जगताप असं या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सायलीची चाचणी परीक्षा सुरु होती. मंगळवारी सकाळी सायली परीक्षा देण्यासाठी शाळेमध्ये गेली असता हा प्रकार घडला आहे. सायलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, अभ्यासाच्या ताणातून तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीरचक्र' पुरस्कार

सायली जगताप मंगळवारी सकाळी परीक्षेसाठी शाळेमध्ये गेली होती. परीक्षा सुरु असलेल्या वर्गामध्ये ती बॅग घेऊन गेली. त्यामुळे शिक्षकाने तिला बॅग वर्गाबाहेर ठेवण्यास लावली. बॅग ठेवण्यासाठी सायली वर्गाबाहेर गेली असता त्याठिकाणी ती चक्कर येऊन खाली पडली. दरम्यान, उपस्थित शिक्षक सायलीला उलचून ताबडतोब नजीकच्या वोव्हार्ट रुग्णालयात घेऊन गेले. मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. 

हरयाणामध्ये गोळ्या झाडून पोलिस उपायुक्तांची आत्महत्या

सायली जगताप ही रिपब्लिकन पक्षाचे तुर्भे विभाग अध्यक्ष अभिमान जगताप यांची मुलगी होती. तुर्भे स्टोअर्स भागामध्ये ती राहत होती. सायली अभ्यासामध्ये अतिशय हुशार होती. तिच्या अचानक मृत्यूमुळे जगताप कुटुंबियांना धक्का बसला आहे. दरम्यान, सायलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालातूनच तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कारण स्पष्ट होणार आहे. 

कलम ३७०: पाकिस्तानने युएनएससीकडे बैठकीची केली मागणी