पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपमध्ये उद्या चार आमदारांचा प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

कालिदास कोळंबकर आणि वैभव पिचड

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. उद्या ४ आमदार भाजप प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर राष्ट्रवादीला रामराम ठोकलेल्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड हे देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या गरवारे क्लबमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली. 

शिवेंद्रसिंह राजेंचं भाजपत जाण्याचं ठरलं, आमदारकीचा दिला राजीनामा

दरम्यान, कालिदास कोळंबकर, वैभव पिचड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला.  शिवेंद्रसिंह राजे यांनीही आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आज सकाळी राजीनामा दिला. त्यासाठी ते सकाळीच मुंबईमध्ये दाखल झाले होते. राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 'लोकसभेनंतरची स्थिती पाहता आणि लोकांचा कामांसाठी दबाव पाहता भाजपबरोबर जाणे संयुक्तिक होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे मी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रसिंह राजे यांनी राजीनाम्यानंतर दिली.  

मी अपयशी ठरलो.. मला माफ करा, सिद्धार्थ यांचे भावनिक पत्र