पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भगवान रामही भाजपची मदत करु शकले नाहीत, संजय राऊत यांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवावरुन शिवसेना नेते संजय राऊत भाजपवर निशाणा साधला आहे. या निकालावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अजिंक्य नाहीत हे समजते, असा टोला त्यांनी लगावला आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपल्या लेखात त्यांनी भाजपच्या धर्मकेंद्रित राजकीय रणनितीचा समाचार घेतला. तसेच अरविंद केजरीवाल प्रणीत दिल्ली सरकारच्या विकासकामांचे कौतुकही केले. 

प्रचंड दबाव तरीही सीएए, ३७० च्या निर्णयावर ठामः मोदी

काय म्हटलंय संजय राऊत यांनी आपल्या लेखात..
लोकसभा निवडणुकीत मजबूत आणि अभेद्य असलेला भाजप विधानसभा निवडणुकीत पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो हे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी स्पष्ट केले. भाजप अजिंक्य नाही व मोदी, शहा यांच्यामुळेच निवडणुका जिंकता येतात या दंतकथांतून लोकांनी आता तरी बाहेर पडायला हवे. आपण बहुमताचा आकडा पार करू, असा विश्वास खुद्द मोदी आणि शहा यांना होता. पण प्रत्यक्षात मोदी आणि शहांच्या भाजपला दहाचा आकडाही पार करता आला नाही. ६२ जागा एकहाती जिंकून केजरीवाल यांनी मोठा विजय मिळवला. दिल्ली विधानसभेचे निकाल संपूर्ण लागले तेव्हा मी उझबेकिस्तानमध्ये उतरलो. ताश्कंद विमानतळाबाहेर तेथे पंधरा वर्षांपासून राहणारे दोन भारतीय भेटले. ‘भाजपचा फुगा फुटायला आता सुरुवात झाली आहे. प्रभू श्रीरामही त्यांना मदत करायला तयार नाहीत,’ असे परदेशी भूमीवरील भारतीय म्हणतात, तेव्हा आश्चर्य वाटत नाही.

अमित शहा हे गृहमंत्री म्हणून स्वतः दिल्लीच्या मैदानात उतरले व त्यांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर केला. देशाचे गृहमंत्री संसदेचे अधिवेशन सोडून दिल्ली विधानसभा प्रचारात उतरले. ठाण मांडून बसले. (पण त्यांना लोकांनी ठोकरून लावले.)

...नाहीतर पंतप्रधान मोदींची माफी मागाः फडणवीस

केजरीवाल हे आतंकवादी, अराजकवादी आहेत असा हल्ला भाजपतर्फे करण्यात आला. त्याचा उलटा परिणाम झाला. केजरीवाल म्हणाले, ‘मी तर हनुमानभक्त आहे.’ केजरीवाल यांच्या हनुमानभक्तीचीही भाजपने चेष्टा केली. त्यामुळे ‘आप’ची मते वाढत गेली.

सतत तीन वेळा दिल्ली काबीज करणारे केजरीवाल लोकसभेची एकही जागा जिंकू शकले नाहीत. दिल्लीत आधी पंधरा वर्षे काँग्रेसचा मुख्यमंत्री व नंतरची पाच वर्षे ‘आप’चे राज्य. भाजप या काळात कोठेच नाही. याला कारण केजरीवाल यांनी प्रचंड काम केले. गरीब, मध्यमवर्गीयांचे पाणी व विजेचे बिल मोफत केले. यावर भाजपचा आरोप असा की, ‘फुकटगिरी’समोर राष्ट्रभक्ती पराभूत झाली. राष्ट्रभक्तीचा मक्ता एकटय़ा भाजपनेच घेतलेला नाही व २०१४ च्या निवडणुकीत जनतेच्या खात्यात फुकटात पंधरा लाख टाकण्याची योजना मोदी यांची होती व त्यावरच मतदान करून घेतले. त्या पंधरा लाखांपैकी पंधरा रुपयेही कुणाच्या खात्यावर जमा झाले नाहीत. राममंदिर, ३७० कलम, कश्मीर, सर्जिकल स्ट्राइक, हिंदुत्व हे सर्व विषय भाजपने जोरात लावून धरले, पण शेवटी जीवनावश्यक गोष्टी, पोटापाण्याचे विषय महत्त्वाचे ठरले व लोकांनी केजरीवाल यांना उचलून डोक्यावर घेतले. जे भाजपला मतदान करणार नाहीत ते देशद्रोही असे भाजपचे प्रचारक सांगत होते.

आग्रा एक्स्प्रेस वेवर ट्रक-व्हॅनमध्ये भीषण अपघात, ७ जण जिवंत जळाले

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Narendra Modi Amit Shah not invincible Says Sanjay Raut in Saamana on Delhi Assembly Election results