पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेना सोडून नारायण राणे यांनी चूक केली - गडकरी

नारायण राणे

२००५ मध्ये शिवसेना सोडून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी चूक केल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. त्याचवेळी काँग्रेसमध्ये गेल्यावर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल, यावर नारायण राणे यांनी उगीचच विश्वास ठेवला, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. निमित्त होते नारायण राणे यांच्या 'नो होल्ड्स बार्ड' या आत्मचरित्राच्या प्रकाशनाचे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये हे आत्मचरित्र प्रकाशित झाले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शुक्रवारी संध्याकाळी हा कार्यक्रम झाला. शरद पवार, नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्रींची निवड

शरद पवार म्हणाले, मला वैयक्तिक असे वाटते की नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडायला नको होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी होते. बाळासाहेबांनी त्यांना अनेक मोठी पदे दिली होती. पक्ष सोडल्यानंतर नारायण राणे द्विधा मनःस्थितीत होते. काँग्रेसमध्ये जावे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. त्यावेळी त्यांनी माझी भेटही घेतली होती. आता त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन चूक केली का, हे मला माहिती नाही.

नारायण राणेंना असे वाटले की मुख्यमंत्रीपदाची त्यांनी केलेली मागणी काँग्रेसमध्ये पूर्ण होईल. पण काँग्रेस हा असा पक्ष आहे की तिथे कोणतेही निर्णय वेगाने घेतले जात नाहीत. राणे त्या संस्कृतीत नवीन होते. पण माझ्यासारख्या नेत्याला हे पक्के माहिती आहे की काँग्रेसमध्ये नेत्यांना आश्वासने दिली जातात. पण ती पूर्ण होतील की नाही, हे सांगू शकत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला.

शिवसेना सोडू नका, हे नारायण राणे यांना सांगण्याचा मी त्यावेळी खूप प्रयत्न केला होता, असे सांगून नितीन गडकरी म्हणाले, नारायण राणे यांच्यासोबतचे माझे नाते हे राजकारणापलिकडचे आहे. माझ्या वैयक्तिक राजकीय कारकीर्दीमध्ये मला दोन नेत्यांबद्दल आदर आहे. एक नारायण राणे आणि दुसरे गोपीनाथ मुंडे. २००५ मध्ये नारायण राणे शिवसेना सोडण्याच्या मनःस्थितीत असताना मी स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी पक्षातील परिस्थिती बघता मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे सांगितले होते. 

पहलू खान झुंडबळी प्रकरण; प्रियांका गांधींविरोधात गुन्हा दाखल

मला असे वाटते की शिवसेना सोडण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता. जर नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नसती, तर आज राज्यातील राजकीय चित्र वेगळे असले असते. नारायण राणे यांच्याकडे आज मोठी जबाबदारी असती, असेही नितीन गडकरी म्हणाले.