पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार, मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित वादग्रस्त रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत लेखी उत्तर दिले आहे. प्रकल्प रायगडमध्ये आणण्यास स्थानिकांचा विरोध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. 

पुणेकरांना हेल्मेट वापरावेच लागणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार येथे खनिज तेल शुद्धीकरणाचा तीन लाख कोटींचा प्रकल्प होणार होता. या प्रकल्पासाठी १६००० एकर जमीन संपादित केली जाणार होती. नाणारमधून ही रिफायनरी आता रायगड जिल्ह्यात येणार आहे. ४० गावांमधील ग्रामस्थांचा भूसंपादनालाविरोध नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे. सौदी अरेबियाची अरमाको कंपनी, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

ट्विटरचं महत्त्व समजून घ्या, अर्थसंकल्प फुटलेला नाही : मुख्यमंत्री

नाणारमध्ये शिवसेनेकडून या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेनेने हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. अखेर हा प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी दिले आहे.

तावडेंचा कारभार होता गोल..गोल, मुंडेंचा टोला