पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत बेस्टचा प्रवास येत्या सोमवारपासून स्वस्त होण्याची शक्यता

मुंबईतील बेस्ट सेवा

बेस्ट प्रशासनाने जाहीर केलेले तिकिटांचे नवे दर येत्या सोमवारपासून लागू होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बुधवारी या नव्या दरांना मंजुरी दिली आहे. पण बेस्टचे नवे दर हे राज्य सरकारने या संदर्भात पूर्वी काढलेल्या शासन आदेशाच्या चौकटीत बसणारे नाहीत. त्यामुळे राज्य सरकारला आपला शासन आदेश सुधारितपणे प्रसिद्ध करावा लागेल. त्याला २-३ दिवस लागतील. त्यानंतर सोमवारपासून बेस्टकडून नवे दर लागू केले जातील.

बेस्टचे सध्या पहिल्या २ किलोमीटसाठी तिकिटाचे दर ८ रुपये आहे. वातानुकूलित बससाठी हेच भाडे २० रुपये आहे. प्रस्तावित दर हे आधीच्या दरांपेक्षा कमी असणार आहेत. ५, १०, १५ आणि १५ पेक्षा जास्त किलोमीटरसाठी बेस्टकडून अनुक्रमे ५ रुपये, १० रुपये, १५ रुपये आणि २० रुपये असे तिकिट दर निश्चित करण्यात आले आहेत. त्याचवेळी वातानुकूलित बससाठी हेच भाडे अनुक्रमे ६ रुपये, १३ रुपये, १९ रुपये आणि २५ रुपये असणार आहे.

नक्षल्यांविरोधात निर्णायक लढाई, आक्रमक कारवाईचे केंद्राचे संकेत

बसभाड्याच्या दरात कपात करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आणि बेस्ट समिती या दोघांनीही आधीच मंजुरी दिली आहे. बुधवारी वाहतूक सचिव आशिष कुमार सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील समितीने या दरकपातीला मंजुरी दिली. 

मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शहर वाहतुकीच्या बसभाड्यासंदर्भात राज्य सरकारने आखून दिलेल्या चौकटीपेक्षा बेस्टचे तिकिट दर कमी आहेत. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या आधीच्या आदेशात सुधारणा करणे गरजेचे आहे. याला अजून काही दिवस लागतील. त्यामुळे सोमवारपासून तिकिटांच्या दरात कपात होईल, अशी शक्यता आहे.

अभिनेत्री भाग्यश्रीच्या पतीला अटक