आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेतील आंदोलनकर्त्या २९ जणांना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. आरे वाचवा मोहिमेसाठी आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या सर्वांना बोरिवलीच्या न्यायालयात हजर केले होते.
आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार
Mumbai's #AareyForest matter: Bail has been granted to the 29 protesters who were arrested from Aarey, under various sections of the Indian Penal Code for disturbing public order & obstructing govt officials from performing their duties.
— ANI (@ANI) October 6, 2019
दरम्यान, वृक्षतोडीचे पडसाद शनिवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. यावेळी भाजप सोडून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी या वृक्षतोडीचा तीव्र निषेध नोंदवला. मेट्रो कारशेड आणि आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी घेतला आहे.
आरेच्या मुद्यावरुन आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा
आरेतील वृक्ष तोडीप्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका देखील कोर्टाने फेटाळून लावली.