पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई पोलिस दलात तब्बल ८८ वर्षांनी अश्वदळ

माऊंटेड पोलीस युनिट

पोलीस दलात १९३२ नंतर तब्बल ८८ वर्षांनी पुन्हा अश्वदळाचा म्हणजेच 'माऊंटेड पोलीस युनिट'चा समावेश करण्यात येणार आहे. प्रजासत्ताकदिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या संचलनात हे पथक सहभागी होणार आहे.वाढती वाहन संख्या आणि वाहतूक कोंडीमुळे डिसेंबर १९३२ मध्ये ‘माऊंटेड पोलीस युनिट’ बंद करण्यात आले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 'माऊंटेड पोलीस युनिट' कार्यरत होणार आहे.

निर्भया बलात्कार : दोषी पवनकुमारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
वाहतूक नियंत्रण, गर्दीच्या ठिकाणी तसेच चौपाटीवर गस्त  घालण्यासाठी हे अश्वदळ उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. सध्या १३ जातिवंत अश्व खरेदी करण्यात आले असून उर्वरित अश्व पुढील सहा महिन्यात खरेदी करण्यात येणार आहेत. अश्वदळात ३० अश्व, एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक उप निरीक्षक, चार पोलीस हवालदार आणि ३२ पोलीस शिपाई यांचा समावेश असेल अशीही माहिती देशमुख यांनी दिली. 

देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेनेः प्रकाश आंबेडकर

आवश्यकता भासल्यास पुणे, नागपूर आदी शहरांतही अश्वदळ सुरू करण्याचा विचार करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mumbai will get a mounted police unit for traffic and crowd control post a gap of 88 years