पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर; कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु

वाडिया रुग्णालय

मुंबईतील प्रसिध्द आणि स्वस्तात रुग्णसेवा देणारे वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. निधी अभावी वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. शासनाकडून रुग्णालयाचे २३० कोटींचे अनुदान थकित आहे. त्यामुळे वाडिया रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर सहभागी झाले आहेत. वाडिया रुग्णालय बंद होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा मनसेने घेतला आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन सावंत देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे द्यावेतः संजय राऊत

गेल्या ३ वर्षांपासून वाडिया रुग्णालयाची आर्थिक परिस्थिती खराब होत चालली आहे. ९० वर्षांपेक्षा जास्त जुनं असलेले वाडिया रुग्णालय निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. महापालिका आणि राज्य शासनाकडून मिळणारा २३० कोटींचा निधी अडकला आहे. अपुऱ्या निधीमुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. वाडिया रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. औषधसाठा संपत आला असून नविन औषध खरेदीसाठी देखील निधी नाही. 

बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची कमाल, ६० कोटींची कमाई; 'छपाक'

दरम्यान, वाडिया रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. कारण रुग्णालयाने नविन रुग्णांना घेणे थांबवले आहेत. तर उपचार सुरु असलेल्या ३५० पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसंच शस्त्रक्रिया करणे देखील थांबवले आहे. थकीत निधी मिळत नाही तोपर्यंत रुग्णसेवा देणे अशक्य असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, दोन दिवसांत बैठक बोलावली जाईल. महापालिकेकडून थकित निधी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करु. दोन दिवसांत ५० टक्के रक्कम देण्याचा प्रयत्न करु, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.  

गायीच्या पाठीवरुन हात फिरवल्यास नकारात्मकता दूर होते