पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरारः चोरट्यांच्या गोळीबारात मोबाइल दुकानमालक ठार

गोळीबार (प्रतिकात्मक छायाचित्र)

विरार पूर्वमधील कुंभारपाडा येथे चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात मोबाइल दुकान मालकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. एका चोरट्याला पकडण्यात जमावाला यश आले. पोलिस पुढील तपास करत आहेत. 

आता आणखी एक राजकीय भूकंप होणार, रामदास आठवलेंचा इशारा

विरार पूर्वमधील कुंभारपाडा येथे रिद्धी-सिद्धी नावाचे मोबाइल विक्रीचे दुकान आहे. ते दररोज रात्री दहा-साडेदहापर्यंत सुरु असते. रविवारी दिवसभर दुकानात मोठी गर्दी झाली होती. दिवसभरात चांगला व्यवसाय झाल्यामुळे दुकानात रोकडही मोठ्याप्रमाणात होती. याचाच फायदा घेत चेहरा झाकून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी थेट दुकानात प्रवेश केला आणि आतून शटर ओढून घेतले. यावेळी दुकानाचे मालक विशालकुमार गुप्ता आणि विजयकुमार गुप्ता हे दोघे भाऊ होते. त्यांनी चोरट्यांचा विरोध केला. त्यावेळी एका चोरट्याने आपल्या पिस्तूलमधून दोन ते तीन वेळा विशालकुमार गुप्तांवर गोळ्या झाडल्या. यात विशालकुमार यांचा मृत्यू झाला. 

रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांनी कमी करण्याची तयारी सुरु

दरम्यानच्या काळात ओरडाओरडीमुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात एकाला पकडण्यात त्यांना यश आला. दुसरा चोरटा पळून गेला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून NEFT सेवेमध्ये आजपासून मोठा बदल