पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधीसाठी मुंबईतले हे रस्ते बंद, या पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना

प्रातिनिधिक छायाचित्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली  महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा  शपथविधी सोहळा गुरुवारी सांयकाळी  शिवाजी पार्कवर होणार आहे. या सोहळ्यांसाठी राजकीय वर्तुळातले  बडे नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सदर परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.   वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत.

३१ डिसेंबरपर्यंत पुणे-मुंबई मार्गावर धावणाऱ्या या गाड्या रद्द

शिवाजी पार्ककडे जाणारे काही रस्ते दुपारनंतर बंद करण्यात येणार असून मुंबईकरांसाठी काही पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे  काही मार्गावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

प्रवेश बंद असलेले आणि पर्यायी मार्ग 
१.  बंद मार्ग - स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (सिद्धविनायक मंदिर ते हरी ओम जंक्शन)
पर्यायी मार्ग - सिद्धविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोर्तुगीज चर्च, गोखले रोड 
२. बंद मार्ग - राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग  उत्तर जंक्शन 
पर्यायी मार्ग -  ए.ल.जे रोड, गोखले रोड- स्टिलमन जंक्शन वरुन उजवे वळण घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग वापरण्याच्या सूचना
३. बंद मार्ग - दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी
पर्यायी मार्ग- राजा बढे जंक्शन  येथून एल.जे रोडचा वापर करण्याच्या सूचना
४. बंद मार्ग - गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर   
पर्यायी मार्ग- एम. बी राऊत मार्ग
५. दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती  बापट पुतळा येथून गडकरी जंक्शन  पर्यंत
६. बाळ गोविंददास मार्ग, पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन सेनापती बापट रोडपासून पश्चिम दिशेल एल.जे. मार्गपर्यंत 
संध्याकाळी ३ वाजल्यापासून रात्री नऊ पर्यंत हे मार्ग वाहतूकीसाठी बंद असणार आहेत.

आदित्य ठाकरेंनी दिल्ली दरबारी जाऊन सोनिया गांधींना दिले निमंत्रण

या ठिकाणी वाहने उभी करण्यास प्रतिबंध 
१. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (सिद्धीविनायक मंदीर ते एम.बी. राऊत रोड
२. केळुस्कर रोड (दक्षिण आणि उत्तर )
३. एम. बी. राऊत मार्ग
४. पांडुरंग नाईक मार्ग
५. दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक)
६. दिलीप गुप्ते मार्गे (शिवाजी पार्क गेट क्रमांक ४ ते शितलादेवी रोड)
७. एन. सी. केळकर  मार्ग (हनुमान मंदीर ते गडकरी चौक)
८. किर्ती कॉलेज रोड
९. काशीनाथ धुरू मार्ग
१०. पी. बाळू मार्ग, प्रभादेवी
११. आदर्श नगर, वरळी कोळीवाडा
१२. आर. ए. के. ४ रोड 
१३. सेनापती बापट मार्ग
१४. रानडे रोड
१५. पी.एन. कोटनीस मार्ग

उद्धव ठाकरेंनी PM मोदींना फोनवरुन दिले शपथविधीचे निमंत्रण

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mumbai Traffic Police issued a traffic advisory shivaji park mumbai traffic updateUddhav Thackeray Oath Ceremony