पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीकेसी ते वाकड फक्त २३ मिनिटांत, हायपरलूप प्रकल्प सहा वर्षांत साकारणार

हायपरलूप (प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणाऱ्या प्रस्तावित अत्याधुनिक वाहतूक प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही शहरांतील अंतर अवघ्या २३ मिनिटांत पार करता येऊ शकेल. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सहा ते सात वर्षांचा कालावधी लागणार आहे. जर सर्व काही ठरविल्याप्रमाणे पार पडले, तर दोन शहरांना जोडण्यासाठी अशा स्वरुपाचा जगातील हा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पापूर्वी चाचणीसाठी ११ किलोमीटरचा पथदर्शी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

सरकार व बँका कोणालाही आयुष्यातून उठवू शकतात, विजय मल्ल्यांचे ट्विट

मुंबई ते पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई आणि हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प हा मुंबई व पुणे या दोन महानगरांना हायपरलूप तंत्रज्ञानाद्वारे जोडणारा प्रस्तावित अत्याधुनिक वाहतूक प्रकल्प आहे. हा प्रकल्प मुंबई-पुणे (कुर्ला बीकेसी ते वाकड) दरम्यान ११७.५० किलोमीटर अंतरासाठी राबविला जाणार आहे. सुमारे ७० हजार कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक यामध्ये होणार असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात अशी गुंतवणूक होणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. विशेष म्हणजे, अतिवेगवान प्रवास साध्य करणारा हा जगातील पहिलाच हायपरलूप प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रस्तावित गती ४९६ किमी प्रतितास अपेक्षित असून, त्यामुळे पुणे ते मुंबई यामधील प्रवासाचा कालावधी फक्त २३ मिनिटांचा होणार आहे.

धक्कादायक!, इन्स्टाग्रामवरील मॉडेलचा रशियात संशयास्पद मृत्यू

पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजार कोटी खर्च होणार असून, या टप्प्यात ११.८० किलोमीटर लांबीचा पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महानगर प्रदेशामध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प हा दोन ते अडीच वर्षात राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. संपूर्ण प्रकल्प ६ ते ७ वर्षांत पूर्ण करण्यात येईल.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पासाठी नीती आयोगाने पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशाच्या परिवहन क्षेत्रात एक क्रांतिकारक पर्व सुरु होणार आहे.