पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले, बेस्टने काही मार्ग बदलले

मुंबईत पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे (फोटो - प्रफुल्ल गांगुर्डे)

मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरार या सर्व ठिकाणी शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने मुंबईत काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यातच मुंबईतील लोकलसेवेवरही या पावसाचा परिणाम झाला असून, मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती मिळते आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहे. पालघर, ठाण्यामध्ये सरकारी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील २ ते ४ तास मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने शनिवारी सकाळी म्हटले होते. 

किंग्ज सर्कल भागात पावसाचे पाणी साचल्याने बेस्टच्या अनेक बसेस पाण्यात अडकल्या आहेत. एकूण सात ठिकाणी बेस्टने बसमार्ग बदलले आहेत. मुंबईकर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून सद्यस्थितीबद्दलची माहिती आणि छायाचित्रे महापालिकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

.. म्हणून पाकने LOC जवळचे दहशतवादी मागे नेले आणि परत पाठवले

मुंबईमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत मालाड सबवे, अंधेरी सबवे, घाटकोपर या भागात काही ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाणी साचल्यामुळे मुंबईत आज वाहतूक कोंडीही होऊ शकते. मुंबईच्या किनाऱ्यावर शनिवारी दुपारी या वर्षातील सर्वाधिक उंचीची लाट येणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.

भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायचं आहे, पण..: सौरभ गांगुली

पालघर, भिवंडी, वसई, विरार या ठिकाणीही पावसाचा जोर जास्त असल्यामुळे तिथेही सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.