पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जेएनयू हिंसाचारः मुंबईत मध्यरात्रीपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन

जेएनयू हिंसाचारः मुंबईत मध्यरात्रीपासून विद्यार्थांचे आंदोलन (Ht photo by Anshuman poyrekar)

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी अभाविप आणि जेएनयू स्टुडंट युनियन (जुंसु) यांच्या गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. युनियनची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला. पुण्यातही एफटीआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. या आंदोलनात विद्यार्थी नेता उमर खालिद यानेही सहभाग नोंदवला. 

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र आले. कँडल मार्च काढत त्यांनी निषेध नोंदवला. मध्यरात्रीची वेळ असूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यात सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. पुण्यातही जेएनयू हिसांचाराचे पडसाद उमटले. मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी अभाविपविरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या.  

टाटा समूहामध्ये कोणतीही भूमिका बजावण्यात रस नाही

मुंबईत आज (सोमवार) सायंकाळी चार वाजता हुतात्मा चौकात अभाविपविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. पुण्यातही सायंकाळी सात वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत. 

दरम्यान, 'एएनआय'च्या वृत्तानुसार तोंडाला रुमाल बांधून आलेल्या काही अज्ञातांना वसतीगृहात घुसून हाणामारी केल्याचा प्रकार घडला. सुमारे ५० हून अधिक अज्ञात कँम्पसमध्ये घुसल्याचे बोलले जात आहे. हल्लेखोरांनी कँम्पसमधील गाड्यांची देखील तोडफोड देखील केल्याचे समजते. जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अज्ञातांनी माझ्यावर हल्ला केला. मला बेदम मारहाण झाली, असे घोष या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताना दिसते.

पाकमध्ये शीख युवकाची हत्या, भारताकडून संतप्त प्रतिक्रिया