पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे सिध्दीविनायक मंदिर भाविकांसाठी बंद

सिध्दीविनायक मंदिर

कोरोना विषाणूमुळे जगभरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात आणि राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालल्यामुळे सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे. त्याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. 

निर्भयाच्या दोषींनी ठोठावला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा

महाराष्ट्रामध्ये सोमवारी ६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ३९ झाली आहे. मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे ६ तर नवी मुंबईमध्ये ३ रुग्ण आढळले आहे. तर देशामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ११५वर पोहचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंदिर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

पिंपरी-चिंचवडमध्ये जमावबंदी लागू पण...

दरम्यान, वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे दोन दिवसांपूर्वी सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना सॅनिटाझर देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईतील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. याच दरम्यान न्यासातर्फे देण्यात येणारी वैद्यकीय मदत रुग्णांसाठी सुरु राहणार आहे. 

पुण्यातील जमाव बंदीच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण